वझरेत वेदांता सेसा कोकच्या पुढाकारातून 'स्वास्थ्य जागृती' शिबीर !

शिबिरात १०४ रुग्ण लाभार्थ्यांची मोफत तपासणी व औषधोपचार
Edited by: संदीप देसाई
Published on: October 16, 2022 17:23 PM
views 178  views

दोडामार्ग : वेदांता सेसा कोक कंपनीच्या पुढाकारातून वझरे ग्रामपंचायत येथे नेत्र, मधुमेह, हीमोग्लोबिन, दंत व 18 वयोगटावरील महिलांची आरोग्य तपासणीबाबत स्वास्थ्य जागृती शिबीर नुतेकच संपन्न झाले. सेसा कोक वझरेतर्फे गेल्या २ वर्षांत विविध आरोग्य विषयक उपक्रम हाती घेण्यात आले असून वझरे पंचक्रोशीतील नागरिकांना आरोग्य सेवा देणे करिता या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

आरोग्य तपासणी शिबीर वझरे गावात आयोजन केल्याबद्दल सरपंच लक्ष्मण गवस व उपस्थित ग्रामस्थ यांनी वेदांता सेसा व्यवस्थानाचे कौतुक केले. या शिबिरांमुळे आरोग्य विषयक जनजागृती होऊन आपल्या गावातील लोकांना महत्त्वाच्या वैद्यकीय सुविधा पुरविण्यात मदत होईल असे स्पष्ट केले.   

सेसा कोकचे प्रमुख बाबाजी पागिरे सेसा कोक यांनी CSR  उपक्रमांतर्गत आरोग्य क्षेत्रात सर्व प्रकारचे सहकार्य  वेदांता सेसा कंपनी करणार असल्याचे आश्वासन दिले. या शिबिरास १०४ रुग्ण लाभार्थ्यांची मोफत तपासणी व औषधोपचार देण्यात आला. तसेच आरोग्य वर्धिनी उपकेंद्र विर्डी अंतर्गत" माता सुरक्षित तर घर सुरक्षित" या उपक्रमाअंतर्गत १८ वयोगटावरील महिलांची वजन, उंची, BMI, रक्तदाब, हीमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र, मोरगावचे कर्मचारी व आशा यांनी शिबिरात उपस्थित राहून सहकार्य केले. गंभीर आजारी रूग्णांसाठी सुसज्ज रूग्णवाहिका पुरवण्यापासून ते दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाला आवश्यक वैद्यकीय उपकरणे पुरवण्यापासून, सेसा कोक कंपनीने दोडामार्ग तालुक्यातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यावेळी वेदांताचे अधिकारी आशिष पिळणकर, वझरे ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.