सावंतवाडी रुग्णालयात नाही हृदयरोग तज्ञ : आशिष सुभेदार

Edited by: विनायक गांवस
Published on: October 01, 2024 16:09 PM
views 32  views

सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सद्यस्थितीत हृदयरोग तज्ञ नाही. तसेच अन्य तज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. नवशिक्या डॉक्टरांकडून रुग्णालयाचा कारभार हाकला जात आहे. जिल्ह्यात येवून आठवड्याला एक करोडो रुपयांचा प्रकल्प आणण्याची घोषणा करणाऱ्या मंत्री दीपक केसरकर यांनी शासकीय रूग्णालयात डॉक्टर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावा अस मत उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांनी व्यक्त केले ‌

ते म्हणाले, शासकीय रुग्णालयात ठिकाणी कार्यरत असलेल्या डॉक्टरांना फक्त 80 हजार इतका पगार दिला जात असल्यामुळे त्यांना तो परवडत नाही त्यामुळे अनेक डॉक्टर रुग्णालय सोडून अन्य खाजगी रुग्णालयात सेवा देत आहेत मात्र खाजगी रुग्णालयात जाऊन सेवा घेणे सर्वसामान्य लोकांना परवडणार नाही त्यामुळे दीपक केसरकर यांनी सिंधूरत्न सारख्या योजनेतून त्या डॉक्टरांचा पगार द्यावा जेणेकरून त्याचा फायदा गोरगरीब रुग्णांना होऊ शकेल याबाबत तात्काळ अंमलबजावणी करावी करोडो रुपयांचे प्रकल्प उभारण्यापेक्षा सर्वसामान्यांचे जीवन जगवले पाहिजे यासाठी केसरकर यांनी प्रयत्न करावे. नाहक लोकांच्या जीवाशी खेळू नये.पिंगुळी येथील युवकाचा अपघात झाल्यानंतर त्याला सावंतवाडीत येथील एका खाजगी दवाखान्यात आणण्यात आले परंतु आवश्यक असलेली आरोग्यसेवा उपलब्ध न झाल्यामुळे तसे कार्डियाक ॲम्बुलन्स न मिळाल्यामुळे तो मृत्युमुखी पडला असे अनेक युवक अपघाती मृत्युमुखी पडत आहे वेळेत वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे ही परिस्थिती आहे. त्यामुळे याबाबत तात्काळ दीपक केसरकर यांनी योग्य ती भूमिका घ्यावी सिंधुरत्न योजनेचा फायदा घेऊन रोजगार प्रकल्प द्याच पण त्यापेक्षा लोकांचे जीव वाचवा. लाडक्या बहिणीना अनुदान देऊन त्याचे कौतुक आताचे सरकार करत आहे. मात्रा लाडक्या बहिणींच्या आरोग्याचे या सरकारला काहीही पडले नाही. गेली पंधरा वर्षा या भागाचे आमदार म्हणून मतदार संघांचे नेतृत्व करणाऱ्या केसरकर यांच्या मतदार संघातील जनता आरोग्यासाठी गोवा आणि कोल्हापूर रुग्णालयावर अवलंबून आहे त्यांना येथील जनतेच्या आरोग्य विषयी काहीही देणे घेणे नाही अशी टीका परशुराम उपरकर समर्थक सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार यांनी केली आहे.