
सावंतवाडी : हजरत जंगली पिरशाबाबा क्रीडा व कला मंडळ यांच्यावतीने उर्स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झिरंगवाडी, सावंतवाडी येथे उपस्थित राहून भाजप प्रदेश युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी दर्ग्यावर चादर चढवली. तसेच उपस्थित बांधवांना शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, अध्यक्ष सोहाब बेग, उपाध्यक्ष राजू वेग, सचिव सुलेमान वेग, सह सचिव तबरेज राऊत, कार्याध्यक्ष जावेद शेख, सहउपाध्यक्ष अन्वर शहा, खजिनदार अल्ताफ मुल्ला, सदस्य रविंद्र आस्वारी, मेहरोज शेख, समीर फौजदार, जुबेर वेग, केतन आजगावकर, अशोक पेडणेकर, आरिफ खान, शाहरुख नाईकवाडी, इरफान शेख आदी मान्यवर उपस्थित होते.










