सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी हरिश्चंद्र पवार तर सचिवपदी मयूर चराठकर

कोकणसाद LIVE चे विनायक गावस यांची सहसचिवपदी तर जुईली पांगम यांची सदस्यपदी वर्णी
Edited by: ब्युरो
Published on: April 08, 2023 16:22 PM
views 223  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी हरिश्चंद्र पवार यांची एकमतानं बिनविरोध निवड करण्यात आली. तर सचिवपदी मयुर चराठकर यांच्यासह कार्यकारिणीची बिनविरोध निवड केली. ही निवड प्रक्रिया जिखमाना मैदानावरील सभागृहात जिल्हा पत्रकार संघाच्या सचिव तथा निरिक्षक देवयानी वरसकर व जिल्हा सदस्य दिपेश परब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यात उपाध्यक्षपदी हेमंत मराठे, दीपक गांवकर, काका भिसे, प्रसन्न राणे, तर खनिजदारपदी रामचंद्र कुडाळकर, सहसचिवपदी कोकणसाद LIVE व दै कोकणसादचे प्रतिनिधी विनायक गांवस यांची निवड करण्यात आली. खेळीमेळीच्या वातावरणात ही निवड प्रक्रिया पार पडली.

यात अध्यक्षपदी हरिश्चंद्र पवार, उपाध्यक्षपदी हेमंत मराठे, दीपक गांवकर, काका भिसे, प्रसन्न राणे,खनिजदारपदी रामचंद्र कुडाळकर, सहसचिवपदी विनायक गांवस तर कार्यकारीणी सदस्य म्हणून मोहन जाधव, नरेद्र देशपांडे, राजू तावडे, लुमा जाधव, जुईली पांगम, निलेश परब, विजय राउत, मंगल कामत, उत्तम नाईक, हर्षवर्धन धारणकर, जतिन भिसे यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी माळवते तालुकाध्यक्ष प्रवीण मांजरेकर यांच्यासह मागील कार्यकारिणीनं केलेल्या गौरवास्पद कार्यासाठी त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. 


नवनिर्वाचित कार्यकारिणीच उपस्थितांकडून अभिनंदन करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष हरिश्चंद्र पवार म्हणाले, अध्यक्ष म्हणून पदाला न्याय देण्यासह विधायक कामावर आपला भर राहील. पत्रकारांचे प्रश्न, पत्रकारांवर होणारा अन्याय यासह विविध योजना राबवून पत्रकार संघाच्या माध्यमातून आदर्शवत काम करण्याचा प्रयत्न राहील अस मत त्यांनी व्यक्त केल. तसेच याप्रसंगी उपस्थित कोकणसाद LIVE चे ब्युरो चीफ तथा दोडामार्ग तालुका पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप देसाई यांना देखिल सावंतवाडी संघाकडून शुभेच्छा देण्यात आल्या. 


याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, कोकणसादचे संपादक सागर चव्हाण, प्रविण मांजरेकर, संतोष सावंत, शिवप्रसाद देसाई, अमोल टेंबकर, मोहन जाधव, उमेश सावंत, सचिन रेडकर, राजू तावडे, अनिल भिसे, भूषण आरोसकर, नागेश पाटील, संतोष परब, सुरेश गवस, गुरुनाथ पेडणेकर, अर्जुन राऊळ, राजेश मोंडकर, विजय देसाई, विजय राऊत, रामदास जाधव, रमेश बोंद्रे, मंगल जोशी, स्वप्निल उपरकर, भगवान शेलटे, अभय पंडीत, संतोष परब, सुरेश गवस, प्रसाद माधव, विष्णू चव्हाण, मंगल जोशी, महादेव परांजपे, स्वप्नील उपरकर, सिद्धेश सावंत, अनुजा कुडतरकर, रूपेश पाटील आदी उपस्थित होते.