
दोडामार्ग : बोडदे, खानयाळे व आवाडे या तीन गावांच्या ग्रुप बोडदे ग्रुप ग्रामपंचायत निवडणूकित सरपंच पदाचे उमेदवार हरिश्चंद्र नाईक यांचा अंतिम टप्प्यातील झंजावती प्रचार लक्षवेधी ठरला आहे. तर या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बोडदे, खानयाळे व आवाडेच्या सर्वांगीण विकास हेच ध्येय ठेवल्याने गावातील जनतेने हरिश्चंद्र नाईक यांना मोठा पाठिंबा दिलाय, तिन्ही गावातील ग्रामस्थांनी आशीर्वाद दिल्याने आपला विजय पक्का असल्याचा विश्वास सरपंच पदाचे उमेदवार हरिश्चंद्र नाईक यांनी व्यक्त केलाय.
हरिश्चंद्र नाईक हे गावपॅनलचे एक तळागाळातील सामाजिक कार्यकर्ते, जाणकार व सक्षम उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचाराला एवढा प्रतिसाद मिळतोय कि, हमखास तेच सरपंच पदी निवडून येतील असं त्यांच्या हितचिंतकाना वाटतंय . गावची सर्व कामे आम्ही आराखड्यात घेतलेली आहेत, त्यामुळं येत्या काळात ती सुद्धा पूर्ण केली जातील याची सर्वांनाच खात्री आहे. आतापर्यंत आम्ही केलेलं काम, हाच आमचा विकासाचा अजेंडा राहील असंही हरिश्चंद्र नाईक यांनी म्हटलं आहे.
सामाजिक कार्याची आवड असल्याने गावाचा सर्वांगीण विकास हे एकच ध्येय समोर ठेऊन आपण निवडणूक लढवीत आहे असं सांगत विकास आराखडा त्यांनी जनतेसमोर ठेवला आहे. यात प्रामुख्याने गावात नियमितपणे पाणीपुरवठा, रस्त्यावर स्ट्रीट लाईटची सोय, आवश्यक ठिकाणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत रस्ते, खानयाळे, आवाडे, बोडदे गावासाठी हक्काची रुग्ण वाहिका सेवा, लोकांचा ग्रामसभेत प्रभावी सहभाग व ग्रामपंचायतमध्ये आपले म्हणणे मांडण्याचा पुर्ण अधिकार, निराधार असलेल्याना घरकुल योजना, नागरिकांच्या सूचनावर अमलबजावणी, बेरोजगारांना रोजगार आणि गाव सेवेसाठी आपण सदैव तत्पर राहणार असल्याचा अजेंडा मतदारांसमोर ठेवल्याने त्यांच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
