खांबाळेत ३०मार्चपासून हरिनाम सप्ताह

राज्यातील मातब्बर किर्तनकार करणार प्रबोधन
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 28, 2023 20:44 PM
views 156  views

खांबाळे येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात हरिनाम सप्ताह 

वैभववाडी:खांबाळे साळुंखेवाडी येथील श्री.देव विठ्ठल रखुमाई भक्ती सेवा मंडळाच्यावतीने श्री.विठ्ठल रखुमाई मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ३० मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.या हरिनाम सप्ताहात समाज प्रबोधनकार किर्तनकार नागेश्वरी झाडे आणि प्रख्यात किर्तनकार परमेश्वर महाराज वरकड यांच्यासह विविध किर्तनकारांचे किर्तन होणार आहे.

खांबाळे येथील श्री.विठ्ठल रखुमाई मंदिरात ३० मार्चला हरिनाम सप्ताहाला प्रारंभ होणार आहे.पाच दिवस चालणाऱ्या या हरिनाम सप्ताहात पहाटे ५ ते ७ काकड आरती,सकाळी ८ ते १२ व दुपारी ३ ते सायकांळी ५ या वेळेत ज्ञानेश्वरीचे पारायण,रात्रौ ९ ते ११ किर्तनसोहळा होणार आहे.

या अखंड हरिनाम सप्ताहात ३० ह.भ.प संतोष महाराज राठोड( मुंबई)३१ एप्रिलला ह.भ.प मोहन महाराज पाटील (सांगली)१ एप्रिलला ह.भ.प.परमेश्वर महाराज वरकड (आळंदी)पुणे,२ एप्रिलला ह.भ.प.नागेश्वरी झाडे (आंळदी देवाची पुणे)यांची किर्तने होणार आहेत.याशिवाय ३ एप्रिलला सकाळी साडेदहा वाजता ह.भ.प रविंद्र महाराज साळुंखे यांचे किर्तन होणार आहे.याशिवाय ३० मार्चला सकाळी मार्चला ह.भ.प विश्वास महाराज जामदार (भोम), यांचे देखील होणार आहे.या संपुर्ण कार्यक्रमाला वारकरी संप्रदायासह सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री.देव विठ्ठल रखुमाई भक्ती सेवा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.