शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी हरेश पाटील तर कणकवली तालुका सचिवपदी रवींद्र नवाळे

जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी निवड केली जाहीर
Edited by: उमेश बुचडे
Published on: July 06, 2023 21:52 PM
views 101  views

कणकवली : सिंधुदुर्ग शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी हरेश पाटील यांची तर कणकवली तालुका सचिवपदी रवींद्र नवाळे यांची तालुका सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना नेते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी बुधवारी ७ जुलै ला कणकवली येथील शिवसेना जिल्हा मध्यवर्ती संपर्क कार्यालयात निवड जाहीर केली आहे.

यावेळी विधानसभा प्रमुख संदेश पटेल, कणकवली तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, समन्वयक सुनील पारकर, राजेंद्र तेली, भगवान तेली, दिलीप वैराग,अरुण दळवी, सुनील गोसावी, जनार्दन पवार, एकनाथ चव्हाण, शांताराम राणे, शांताराम पार्टे, सुभाष परब, शशिकांत परब विजय परब, दीपक चव्हाण, पांडुरंग चव्हाण, प्रमोद पवार, अरविंद सावंत, अनंत सावंत, प्रदीप कामतेकर आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अभिप्रेत असणारे पक्ष संघटनेचे काम करून लोकहिताच्या कामांना प्राधान्य देणार आहे. गावोगावी जाऊन शिवसेना शाखा उघडून पक्षसंघटना मजबूत करणार असल्याचे हरेश पटेल यांनी सांगितले.