
कणकवली : एप्रिल - मेमध्ये उन्हाळ्याची चाहूल लागताच बाजारपेठेत हापूस आंब्याचे आगमन झाले. सुरुवातीला आंब्याचे दर सर्वसामान्यांना परवडणारे नव्हते. मात्र जस जसे आंबा जास्त प्रमाणात बाजारात आले तस तसे दर थोडेसे कमी होत आहेत. मंगळवारच्या बाजारात 800 ते 1500 रुपयांपर्यंत हापूस आंबा ग्राहकांना बाजारात उपलब्ध आहे.
यावर्षी हवामान बिघाड झाल्याने आंब्याची आवक कमी झाली. पण युद्धामुळे आंबा एक्स्पोर्ट होत नसल्यामुळे कणकवली बाजारात आंब्याची आवक वाढली आहे. दरही तुलनेने नियंत्रणात आहेत. सध्या दर्जानुसार हापूस आंब्याचे दर कमी-जास्त असून, सर्वसामान्य ग्राहकांनाही आंबा खरेदी करणे शक्य होत आहे.
व्यापाऱ्यांनी सांगितले की, पुढील काही दिवसांत आंब्याची आवक आणखी वाढण्याची शक्यता असून दरात आणखी घसरण होऊ शकते. त्यामुळे आंबा प्रेमींसाठी ही आनंदाची बातमी ठरत आहे. दरम्यान, कणकवली बाजारात हापूस आंब्याची चव आणि सुगंध अनुभवण्यासाठी ग्राहक खरेदी करतायत.











