
सावंतवाडी : वैश्य समाजाचा वारसा नवी पिढी पुढे घेऊन जात आहे याचा आनंद आहे. माझं प्रेम सावंतवाडीवर अधिक आहे. समाजातील कुठल्याही बांधवाला गरज असेल त्यावेळी मला हाक मारा, तुम्हाला निश्चित सहकार्य करेन. पुण्श्लोक बापुसाहेब महाराजांनी दिलेल्या शिकवणीनुसार इतर समाजातील लोकांनाही सरकारचा एक मंत्री आणि आमदार म्हणून सदैव मदत करेन असं प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलं. येथील वैश्य समाज विद्यार्थी गुणगौरव सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते वैश्य समाजातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
वैश्य भवन सावंतवाडी येथे वैश्य समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केसरकर म्हणाले, मुलांना जर्मनीत नोकरी देण्यासाठी आम्ही उपक्रम हाती घेतला आहे. कौशल्यावर आधारीत हा उपक्रम आहे. जर्मनी भाषा प्रशिक्षण वर्गाचा देखील शुभारंभ आज करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून याची सुरुवात झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील युवकांना दिशा देणारा हा जिल्हा ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर विद्यार्थी, महिला, युवकांसाठी आम्ही विविध उपक्रम हाती घेणार आहोत. इतर समाजात त्या समाजातील पुढे जाणाऱ्या व्यक्तीला प्रोत्साहन देताना आपण पहातो. मात्र, काहींना चांगलं दिसतं नाही. अशा लोकांना वैश्य समाजाच्या स्वामींच्या दर्शनासाठी पाठवाव लागेल. म्हणजे त्यांचा दृष्टिकोन बदलेल असा खोचक टोला केसरकर यांनी नावं न घेता राजन तेलींना हाणला.
यावेळी याप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, वैश्य समाज जिल्हाध्यक्ष सुनिल भोगटे, वैश्य समाज तालुकाध्यक्ष रमेश बोंद्रे, अँड. पुष्पलता कोरगावकर, प्रसाद पारकर, अँड. दिलीप नार्वेकर, राजन पोकळे, साक्षी वंजारी, किर्ती बोंद्रे, समीर वंजारी, सुरेंद्र बांदेकर, दत्तप्रसाद मसुरकर आदी वैश्य समाज बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैश्य समाज तालुकाध्यक्ष रमेश बोंद्रे यांनी तर सूत्रसंचालन कल्पना बांदेकर यांनी केल.