
देवगड : दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणारा जागतिक हात धुवा दिन स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा एक जागरूकता दिन आहे. यानिमित्ताने देवगड तालुक्यात शाळा, अंगणवाडी केंद्र ,तसेच ग्रामपंचायतीमार्फत जनजागृती उपक्रम राबवण्यात येणार असुन या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन गटविकास अधिकारी देवगड अरुण चव्हाण यांनी केले आहे .
या उपक्रमामध्ये शाळांमध्ये हात धुण्याच्या पद्धतींचे प्रात्यक्षिक, जनजागृती रॅली तसेच शालेयस्तरावर रांगोळी, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे .