'ज्ञानदीप'चे पुरस्कार जाहीर..!

Edited by: विनायक गांवस
Published on: February 24, 2024 14:29 PM
views 305  views

सावंतवाडी : येथील 'ज्ञानदीप' शिक्षण विकास मंडळाचे सन २०२४ सालचे मानाचे पुरस्कार आज जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हयातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार, पत्रकारिता, कला, संगीत, उद्योग, क्रीडा, कृषीक्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हे मानाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ज्ञानदीपचे संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी हे पुरस्कार जाहीर केले. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली १८  वर्षे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, कृषी आणि अन्य क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा ज्ञानदीप मंडळातर्फे पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. अध्यक्ष जावेद शेख यांचे अध्यक्षतेखाली यंदाचे पुरस्कार जाहीर केले. जिल्हाभरातून आलेल्या विविध प्रस्तावांची छाननी करण्यात आली.

हे ठरले यंदाचे ज्ञानदीप पुरस्कारार्थी !

यंदाच्या पुरस्कारांमध्ये संजय कृष्णा बांबुळकर (पदवीधर शिक्षक) प्रा. सौ. सुमेधा सुशील सावळ (बांदा) सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल राजन गोविंद मडवळ (कुणकेरी), सौ. मृगाली महेश पालव (कोलगाव - सावंतवाडी), सलीम तकीलदार ( मुख्याध्यापक शिवराज मराठा विद्यालय, साळगाव, ता. कुडाळ ), प्रा. राजाराम महादेव परब (उत्कृष्ठ शैक्षणिक कार्याबद्दल - कुडाळ ) तसेच सहकार व पत्रकारितेतील पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे (दोडामार्ग) यांना यंदाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले. यावेळी निवड समितीचे एस. आर. मांगले, संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक, अध्यक्ष जावेद शेख, कार्याध्यक्ष निलेश पारकर, उपाध्यक्ष प्रा. रूपेश पाटील, सहसचिव विनायक गांवस, मंडळाचे सदस्य भरत गावडे, कवी विठ्ठल कदम, प्रज्ञा मातोंडकर, रश्मी भाईडकर, श्रद्धा सावंत, कळसुलकर प्रशालेचे मुख्याध्यापक एन. पी. मानकर, वैभव केंकरे, उपक्रमशील प्राथमिक शिक्षिका शामल मांजरेकर, प्रा. नागेश कदम, कळसूलकरचे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप सावंत आदी उपस्थित होते.

शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून हे पुरस्कार एस. आर. मांगले, आर. व्ही. नारकर, रश्मी भाईडकर, स्वप्नील  परब यांनी पुरस्कृत केले आहेत. लवकरच पुरस्कार विजेत्यांचा ज्ञानदीप मंडळामार्फत पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे

गेल्या तब्बल १८ वर्षातील शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक व कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान व कौतुकाची थाप व प्रेरणादायी असल्याचे निवड समितीने यावेळी घोषित केले. दरम्यान, सर्व पुरस्कार विजेत्यांचे ज्ञानदीप मंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.