कणकवलीत १५ लाखांचा गुटखा जप्त...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: October 03, 2023 11:00 AM
views 424  views

कणकवली : गोव्यावरून मुंबईच्या दिशेने अवैध गुटखा वाहतूक करणारा आयशर टेम्पो रंगेहाथ पकडला आहे. कणकवली पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सापळा रचून गुटखा वाहतुकीचा पर्दाफाश करण्यात आला. कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील, यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक शरद देठे, बापू खरात, संतोष शिंदे प्रदीप दबडे, चालक भूषण सुतार आदींच्या पथकाने हे कारवाई केली. आहे त्यामुळे कणकवलीचा जिल्ह्यामध्ये अवैध गुटखा विक्री करण्याचे आता धाबे दणाणले आहेत.

सोमवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास जानवली येथे हॉटेल नीलमकंट्री साईड नजीक करण्यात आली. यामध्ये आयशर ट्रक क्रमांक MH 07 AX 0305 या टेम्पो सह चालकाला देखील ताब्यात घेण्यात आले.

या टेम्पो मध्ये विमल तंबाखू व गुटखाची 32 पोती मिळून 15 लाख 15 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर आयशर टेम्पो ची किंमत 8 लाख मिळून 23 लाख 15 हजाराचा मुद्देमाल कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 नुसार तसेच भादवी कलम 328 नुसार संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिली.