गुरूवर्य रूपेश पोवार यांचा मळगावमध्ये होणार "आशिर्वाद गुरुमाऊलीचा" कार्यक्रम

Edited by: विनायक गावस
Published on: August 05, 2023 13:08 PM
views 91  views

सावंतवाडी : मळगाव मध्ये जगदंब संगीत विद्यालय संचालक गुरूवर्य रूपेश पोवार यांचा "आशिर्वाद गुरुमाऊलीचा" हा कार्यक्रम होणार आहे. उद्या रविवार दि. ६ आॅगस्ट२०२३ रोजी दुपारी १:३० वाजता खानोलकर मंगल कार्यालय सुधीर भागवत यांच्या हाॅल मध्ये "आशिर्वाद गुरूमाऊलीचा" हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमात विद्यालयाच्या मुलाचे पखवाज तबला सोलो वादन भजन वादन होणार आहे. या कार्यक्रमास सिंधुदुर्गातील भजन दशावतार आणि डबलबारी क्षेञातील सुप्रसिध्द कलाकाराची उपस्थिती व गायन वादन असणार आहे. तरी या कार्यक्रमात सर्वानी आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन सुधीर राऊळ आणि जगदंब संगीत विद्यालयाच्या विद्यार्थानी केले आहे.