श्री सद्गुरू संगीत विद्यालयाच्यावतीने ६ ऑगस्टला 'गुरुवंदना'

Edited by: विनायक गावस
Published on: July 29, 2023 13:37 PM
views 100  views

सावंतवाडी : श्री सद्गुरू संगीत विद्यालय, सावंतवाडीच्या माध्यमातून प्रतिवर्षीप्रमाणे 'गुरुवंदना' या कार्यक्रमाचे आयोजन रविवार ६ ऑगस्ट २०२३ रोजी विठ्ठल मंदिर सावंतवाडी येथे प्रथम व द्वितीय सत्रांमध्ये करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सद्गुरू संगीत विद्यालयाचे गुरूवर्य निलेश मेस्त्री यांचे नवोदित व यशस्वी विद्यार्थी शास्त्रीय गायन वादन करणार आहेत.

प्रथम सत्र  स. ९.३० ते १.३० उद्घाटन समारंभ व नवोदित विद्यार्थ्यांचे शास्त्रीय गायन वादनाचे सादरीकरण  तर दुसऱ्या सत्रात दु ४.०० ते ८.००  विद्यालयाच्या नामांकित व यशस्वी विद्यार्थ्यांचे शास्त्रीय गायन वादनाचे सादरीकरण विठ्ठल रखुमाई मंदीर,सावंतवाडीत होणार आहे. यावेळी सर्व संगीत प्रेमींनी उपस्थित रहाण्याच आवाहन सद्गुरू संगीत विद्यालय शिष्य परिवार व पालक वर्गाकडून करण्यात आले आहे.