
सावंतवाडी : येथील माठेवाडा अंगणवाडीतील केवळ ३ वर्षांच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेचा अनोखा सोहळा साजरा केला. या लहानग्यांनी प्रथम आपल्या मातेला आणि त्यानंतर आपल्या शिक्षकांना वंदन करून गुरुपौर्णिमा उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी केली.
माठेवाडा अंगणवाडी क्रमांक १५ मध्ये आज गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बालकांनी आपल्या मातांचे पाय धुवून त्यांची पूजा केली आणि औक्षण केले. यानंतर त्यांनी आपल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि सुधाताई वामनराव कामत प्राथमिक शाळेतील शिक्षकांचेही पाय धुवून पूजन केले आणि त्यांना वंदन केले.
या कार्यक्रमात दुर्वांश जाधव, गीतांश मुंज, सावी नेवगी, गंधार नाईक, युवराज चव्हाण, कबीर परब, रुद्र मिसाळ, दूर्वा गावडे, अथांग मातोंडकर, सार्थक नेवगी, बिहान मडगावकर, अलिशा दापले यांसारख्या अनेक बालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या उपक्रमासाठी माठेवाडा सुधाताई वामनराव कामत प्रशालेच्या मुख्याध्यापिका भक्ती फाले, शिक्षिका प्राची ढवळ, हेमांगी जाधव, पूजा ठाकूर, भावना गावडे, रंजीत सावंत, अंगणवाडी सेविका अनुराधा पवार, मदतनीस अमिषा सासोलकर आणि पालक नेहा काष्टे, पूजा गावडे, शिवानी तूयेकर, जान्हवी गावडे, आर्या मुंज, तेजस्विनी चव्हाण, स्वानंदी नेवगी, सानिका मातोंडकर सपना जाधव नेहा नेवगी धनश्री पाटील यांच्यासह अनेक पालक उपस्थित होते.
लहान मुलांनी धार्मिक भावनेतून आपल्या पहिल्या गुरु असलेल्या आई आणि त्यानंतर शिक्षक-गुरुजनांना वंदन करून गुरुपौर्णिमेचा दिवस आनंदाने साजरा केला. या अनोख्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी केल्याबद्दल सर्वत्र या चिमुकल्यांचे कौतुक होत आहे.