बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक

शिवसैनिकांची गुरुपौर्णिमा
Edited by: मनोज पवार
Published on: July 10, 2025 15:14 PM
views 82  views

चिपळूण : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, चिंचनाका येथे गुरुपौर्णिमेचा उत्सव जल्लोषात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. खासदार व शिवसेना नेते मा. विनायकजी राऊत यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाप्रमुख (दक्षिण) श्री. दत्तात्रय कदम व जिल्हाप्रमुख (उत्तर) श्री. बाळा खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्यदिव्य प्रतिमेला दुग्धाभिषेक व पूजन करून गुरुपौर्णिमेची परंपरा साजरी करण्यात आली. त्यांच्या कार्याचे स्मरण करून उपस्थित शिवसैनिकांनी कृतज्ञता व्यक्त केली.

या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख प्रतापराव शिंदे, विधानसभा क्षेत्राध्यक्ष बाळा कदम, तालुकाप्रमुख बळीराम गुजर, ज्येष्ठ शिवसैनिक राजू भागवत, युवासेना तालुकाअधिकारी उमेश खताते, शहर अधिकारी पार्थ जागुष्टे, सचिव प्रशांत मुळे, उपशहरप्रमुख संजय रेड्डीज, राजन खेडेकर, राजू विखारे, सचिन (भैय्या) कदम, मिथिलेश (विकी) नरळकर, संतोष पवार, माजी नगरसेवक मनोज शिंदे, संतोष टाकळे, विभाग प्रमुख शेखर लवेकर, पांडुरंग निवाते, बापू चिपळूणकर, अजित गुजर, सचिन शेट्ये, बाबू शिर्के, दीपक ओकटे, मनोज पांचाळ, संकेत शिंदे, संजय गोताड, बावा राजेशीर्के, समीर राऊत यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

कार्यक्रमात महिला आघाडी उपशहर संघटीका अर्चनाताई कारेकर, हर्षाली पवार, उपविभागप्रमुख अनंत खैर, युवासेना तालुका सचिव प्रतिक शिंदे, शाखाप्रमुख किशोर राऊत, उदय जुवळे, मंदार शिंदे, युवासेना विभागप्रमुख राहुल गुरव, अक्षय सकपाळ, ज्येष्ठ शिवसैनिक विलास राऊत, सतीश शिंदे, संतोष जाधव, उमेश नानीष्कर, बंड्या मोरे, पांडू पोवार, सोशल मीडिया तालुकाप्रमुख सचिन चोरगे यांचाही सहभाग होता.

या प्रसंगी बोलताना उपस्थित नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचे स्मरण करत शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर श्रद्धा व्यक्त केली. कार्यक्रमात मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्रद्धा, संस्कृती आणि संघटनशक्ती यांचा संगम या कार्यक्रमात पहायला मिळाला.