
दोडामार्ग : शिक्षणाच्या आयचा घो ! अभिनेता भरत जाधव यांचा हा सिनेमा सरकार अन् शिक्षणव्यवस्थेला आरसा दाखवून गेला होता. त्यानंतर अमुलाग्र बदल शिक्षण विभागात घडले. पण, आज विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षकांचे होणारे हाल अपेष्टा पाहता खरंच शिक्षणाचा आयचा घो असं म्हणायची वेळ विद्यार्थी पालकांसह शिक्षकांवर देखिल येऊन ठेपलीय.
शून्य शिक्षकी शाळांचा प्रश्न जिल्हाभर गाजत असताना आणि तो प्रश्न सोडविणेसाठी शिक्षण विभाग केविलवाणी सारवासारव करत असताना दोडामार्ग तालुक्यातील शिक्षक भारतीनं या विरोधात एल्गार छेडण्याचा निर्धार केला आहे. शिक्षण विभाग प्राथमिक शाळामधील दोडामार्ग तालुक्यातील रिक्त असलेल्या शिक्षक पदामुळे कार्यरत असलेल्या शिक्षकांवर अतिरीक्त कार्यभार पडल्यामुळे शिक्षक तणावपूर्ण वातावरणात वावरत असल्याबाबतच्या संतप्त भावना त्यांनी शासनदरबारी व्यक्त केल्या आहेत.
प्राथमिक शिक्षक भारती दोडामार्गच्यावतीने कार्यरत शिक्षकांना शाळांना अतिरीक्त भार सांभाळावा लागल्याने तणावपूर्ण वातावरणात शिक्षक वावरत आहेत. दोडामार्ग तालुक्यात इ. १ ली ते ४ थी व १ ते ७ वी अशा प्राथमिक शाळा आहेत. या शाळामध्ये शिक्षकांची रिक्त पदे असल्याने कार्यरत शिक्षकांना ४ वा ७ वर्ग सांभाळावे लागतात. एखादे उदा. द्यायचे झाले तर
१ ली ते ४ थी वर्ग पटसंख्या ३४, एक शिक्षक त्यामध्ये चारही वर्गाचे आस्थापन स्वाध्याय तपासणे, प्रत्येक वर्गावर लक्ष ठेवणे, शाळेचे प्रत्येक दिवसाचे रजि. नोंद, शा. पो. नियोजन, विद्यार्थी विषयावर प्रगती, त्याबरोबर पालकांचे दाखले देणे या सर्व गोष्टीमुळे शिक्षकांची होणार कसरत व त्यामुळे आरोग्यवर होणाऱ्या परिणामाला जबाबदार कोण ? तालुक्यामध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकामधून स्वतःची शाळा सोडून कामगीरीसाठी काढलेल्या शिक्षकावर मोठ्या प्रमाणात अन्याय झाल्याचे दिसून येत आहे. शासन निकषानुसार कामगिरी ही ८ किमी अंतरावर किंवा केंद्रात असणे आवश्यक आहे. परंतू असे न होता बऱ्याच शिक्षकांना शासन निकष डावलून कामगिरी काढल्याने त्यांच्यावर अन्याय होत आहे. आज निपूण भारत नुसार गुणवत्ता साधायची असल्यास शासनाच्या आरंभलेल्या घोरणानुसार गुणवत्ता कधी साधाल ? भविष्यात कमी होणाऱ्या गुणवत्तेस जबाबदार कोण? असे प्रश्न पडत आहे. शासकीय परीपत्रके, रजिस्टरे व त्या बरोबर विद्यार्थी गुणवत्ता साधण्यासाठी शिक्षक करत असलेल्या अध्यापन त्यामधून काही शिक्षक विविध आजारांनी त्रस्त असून आजच्या प्राप्त परिस्थितीवरुन संबंधीत शिक्षकांच्या जिवीतास धोका झाला याला जबाबदार कोण ? या परिस्थितीचा जाणीवपुर्वक विचार करुन योग्य तो मार्ग शासनानं काढावा, अन्यथा धरणे आंदोलन सारख्या मार्ग पत्करावा लागले असा इशारा त्यांनी दिला आहे.
यासंदर्भात नुकतीच शिक्षक भा संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून या बैठकीत 03 जुलै रोजी रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत तालुका गटशिक्षण अधिकारी यांचे कार्यालयासमोर शिक्षक भारतीच्या वतीनं धरणे आंदोलन छेडलं जाणार असल्याची माहिती पदाधिकऱ्यांनी दिली आहे.