
देवगड : गुरुदास शिष्य परिवाराच्यावतीने कोकण कलाभूषण, सुप्रसिध्द भजनकार, भजन सम्राट बुवा चंद्रकांत काशीराम कदम यांच्या १९ व्या स्मृतिदिना निमित्त देवगड तालुक्यातील आरेफाटा येथील गुरुदास चौक येथे शनिवार ३० डिसेंबरला गुरुदासमय आनंद सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७.३० वाजता आरे फाटा गुरुदास चौक येथील स्मारकाजवळ गणेश पुजन, मान्यवराच्या हस्ते दीपप्रज्वलन, भजनी कलावंताचा चक्री भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता गुरुदास पालखी सोहळा आणि दिंडी भजन, दुपारी १ वाजता मान्यवराचे आभार प्रदर्शन आणि महाप्रसादानंतर गुरुदासवारी आनंद सोहळ्याची सांगता होणार आहे. हा कार्यक्रम आरे आणि वळिवंडे ग्रामस्थांच्या विशेष सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात श्रेष्ठ भजनी कलावंत, मान्यवर आणि तमाम भजन रसिकांनी सहकुटुंब सहभागी व्हावे असे गुरुदास शिष्य परिवाराचे अध्यक्ष लक्ष्मण गुरव, उपाध्यक्ष भगवान लोकरे, सेक्रेटरी रवींद्र लाड व गुरुदास शिष्य परिवार यांनी आवाहन केले आहे.