दोडामार्ग : कुबल सरांना शिक्षक विद्यार्थी समाज यांचे जे भरभरून प्रेम मिळाले त्याचे प्रतीक आजच्या सत्कार सोहळ्याची उपस्थिती आहे. त्याहूनही महत्वाचे म्हणजे ज्या माऊलीने जन्म दिला. त्या माऊलीच्या उपस्थितीत सेवापूर्ती सत्कार होणे हा क्षण आणि एकंदर कार्यक्रमाचे वर्णन करताना भाग्यवान कुबल गुरुजी म्हणावे लागेल असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी राज्यध्यक्ष तथा विद्यमान सल्लागार प्रकाश दळवी यांनी व्यक्त केले.
दोडामार्ग येथील सुशीला हॉल येथे कोलझर केंद्राचे केंद्र प्रमुख गुरूदास जनार्दन कुबल हे 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्तच्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाशभाई दळवी, सत्कार मूर्ती गुरुदास कुबल, भाग्यश्री कुबल, सामाजिक कार्यकर्ते उद्योजक विवेकानंद नाईक, गट शिक्षण अधिकारी, किशोर गवस, जनार्दन कुबल, डॉ. गणपती करमळकर, रत्नाकर धाकोरकर, रामचंद्र आंगणे, माजी सभापती दिपीका मयेकर, माजी उपसभापती, विशाखा देसाई, नगरसेवक चंदन गावकर, नगरसेविका संध्या प्रसादी, माजी नगरसेविका रेश्मा कोरगांवकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, उसप माजी सरपंच प्रकाश गवस, सतीश घोटगे, विश्वनाथ रेडकर, प्राध्यापक संदीप गवस, पाडगावकर शिक्षक, अर्जुन राणे, डॉ. रामदास रेडकर, सौ. लिना कुबल माजी नगराध्यक्ष, महादेव कुबल, प्रणय मोरजकर, इतर मान्यवर शिक्षक वर्ग उपस्थित होते. मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलित करून सुरुवात करण्यात आली.
उपस्थित मान्यवर मंडळी यांचे भुवन कुबल, महादेव कुबल, लिना कुबल, इतर कुबल कुटुंब यांनी पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सन्मानित केले. गुरुदास कुबल यांच्या सोबत काम केलेले अनेक शिक्षक शिक्षिका मोठ्या संखेने उपस्थित होते.
गौरव ग्रंथाचे प्रकाशन
या कार्यक्रमाच्या दरम्यान कॉल गुरुजींचे बालपण हे 36 वर्षाची शिक्षकी कारकीर्द त्यातील जीवनपत विषयाच्या "आधारवड " शीर्षकाखाली एका गौरव आंथाचेही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मोठी उपस्थिती
सेवापूर्ती सत्कार सोहळा वेळी अनेक आजी माझी शिक्षक विद्यार्थी तसेच राजकीय पदाधिकारी या याबरोबर तू बोल गुरुजींचे स्नेही यांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावत गुरुजींना शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली होती. गुरुजींची छत्तीस वर्षे कारकीर्द उपस्थिततांच्या डोळ्यासमोर भरकन उभी रहावी असा माहितीपर सांगणारा देखणा कार्यक्रम यावेळी दिसून आला. या कार्यक्रमाला औक्षण स्वागत पारंपरिकबाज पद्धतीने झाले. तर मान्यवर उपस्थित यांचे स्वागत सुमधुर गीताने त्यांचे सहकारी शिक्षिका यांनी सादर करत कार्यक्रमात विविधता आणली.
समाजाच्या ऋणातून उत्तराई घेणे कठीण : कुबल गुरुजी
आजची उपस्थिती बघून आपण भारावलो. ज्यांनी ज्यांनी आपणाला छत्तीस वर्षाच्या प्रतिक सेवेत मदत केली. त्यांचे ऋण फेडता येणे अशक्य आहे. त्यांच्या रूपाने आणि सामाजिक बांधिलकीचं प्रेमात नेहमी राहीन अस गुरूदास कुबल यांनी बोलताना सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक कुबल गुरुजी यांचे सहकारी यांनी मेहनत घेतली. प्रास्ताविक प्रभाकर धुरी यांनी केले तर सुञसंचालन गवस यांनी केले. तर आभार प्रणिता मोरजकार यांनी मानले.