सरपंच सेवा संघाच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी गुरुदास गवंडे

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: October 07, 2022 20:26 PM
views 153  views

सावंतवाडी :  महाराष्ट्रातील सर्व सरपंचांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेल्या सरपंच सेवा संघाच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे यांची निवड करण्यात आली आहे. श्री .गवंडे हे सावंतवाडी तालुक्यातील निगुडे गावचे सुपुत्र असून गेली अनेक वर्षे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत तालुका सर्व सरपंचांना संघटित करणे, मार्गदर्शन करणे  आदी कार्याची  जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

  श्री. गवंडे यांचे सावंतवाडी तालुक्यातील विविध क्षेत्रातील भरीव योगदान पाहून अहमदनगर येथे पार पडलेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरपंच सेवा संघ या सरपंचांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या संघटनेच्या सावंतवाडी तालुकाध्यक्षपदी गुरुदास गवंडे यांची निवड झाल्याबद्दल सावंतवाडी तालुक्यासह जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. दोडामार्ग सरपंच सेवा संघाच्या तालुकाध्यक्षपदी प्रवीण गवस यांची नियुक्ती केल्यानंतर सावंतवाडी तालुकाध्यक्ष पदी गुरुदास गवंडे पदाची निवड झालेली आहे.

तसेच मालवण तालुकाध्यक्षपदी पळसंब गावचे सरपंच श्री चंद्रकांत गोलटकर यांची निवड झालेली आहे. अन्य तालुक्यातील सरपंच सेवा संघ तालुकाध्यक्ष लवकरच  जाहीर करण्यात येतील असे सरपंच सेवा संघ  महाराष्ट्र राज्य सरचिटणीस श्री बाबासाहेब पावसे  यांनी सांगितले आहे.