
सावंतवाडी : गुरूने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा ह्या उक्तीप्रमाणे माणसाच्या जीवनात गुरूला खूप महत्त्व आहे. शिक्षकांना वैदिक काळापासून गुरूचे स्थान आहे. त्यांच्या ॠणांतुन आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही अशा भावना व्यक्त करत देशभक्त शंकरराव गव्हाणकर महाविद्यालयात गुरूंविषयी आदर प्रेमभाव व्यक्त करत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी व्यास मुनींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदन करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व आपल्या गुरूंच्याप्रती आदर व्यक्त केला. विद्यार्थी श्रीरंग जोसोलकर , चिन्मय सावंत यांने गुरुपौर्णिमेबद्दल माहिती सांगितली.
मुख्याध्यापक यशोधन गवस यांनी आपले मनोगतपर भाषण व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंच्या प्रती कायम आदर बाळगून आपलं काम चोख बजावले पाहिजे. तरच आयुष्यात आपण यश संपादन करू शकतो असे प्रतिपादन यावेळी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोहम शिरोडकर याने केले. हा गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांचा मोलाचा सहभाग लाभला.