दशावतारातील गुरुशिष्य परंपरा वृध्दींगत करणारी गुरुपोर्णिमा कुडाळ इथं होणार साजरी...!

Edited by: विनायाक गावस
Published on: July 02, 2023 17:06 PM
views 184  views

दोडामार्ग : सन २०२२ पासून म्हणजेच गेल्या वर्षीपासून आपण सुमारे आठशे वर्षा अधिक काळ चालत आलेल्या दशावतार कलेचे संवर्धन करुन ती वृध्दींगत करण्याच्या हेतुने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधुन एकमेकांच्या आपुलकीच्या सहवासात राहून जेष्ठ कलावंतांच्या उपस्थितीत गुरुशिष्य परंपरेचा आगळावेगळा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या सहकार्यातून सोमवार दिनांक ०३ जुलै २०२३ रोजी सकाळी ९:३० ते १०:०० या वेळेत महालक्ष्मी हॉल नं. २ गुलमोहर हॉटेल कुडाळ येथे होणार आहे.

सदर गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात ऋषीतुल्य गुरुतुल्य दशावतार जेष्ठ कलावंत श्री. जयसिंग राणे, श्री. प्रभाकर पार्सेकर, श्री. जीजी चोडणेकर, श्री. भाई ऊर्फ भास्कर सामंत, श्री. सुरेश गावडे, श्री. आजोबा परुळेकर (तबला), श्री. एकनाथ गोसावी (हार्मोनियम) यांच्या उपस्थितीत गुरुतुल्य 'व्यक्तींचे पाद्यपुजन करुन साजरा करण्यात येणार आहे.

तरी सदर कार्यक्रमास त्यांचे शिष्य, हितचिंतक, नाट्यरसिक यांनी ऊपस्थित उपस्थित रहावे असे आवाहन फरा प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी केले आहे.