माठेवाड्यातील अंगणवाडीच्या छोट्या बालकांकडून गुरुपौर्णिमा

Edited by: विनायक गावस
Published on: July 05, 2023 17:48 PM
views 54  views

सावंतवाडी : माठेवाडा येथील जिल्हा परिषद शाळा नंबर दोन मधील अंगणवाडी क्रमांक 66 च्या छोट्या बालकांनी आज गुरुपौर्णिमा उत्सव निमित्त आपल्या गुरुचे आशीर्वाद घेतले. यावेळी अंगणवाडी सेविका अनुराधा पवार आणि मदतीस अमिषा सासोलकर यांना आणि आपल्या आईला छोट्या बालकांनी ओवाळणी करून औक्षण केले.

सुरुवातीला प्रथम गुरु असलेल्या आईचे पाय धूऊन त्यांना दंडवत करण्यात आले. त्यानंतर गुरू म्हणजेच शिक्षकांना  वंदन करण्यात आले. श्लोक म्हणण्यात आले गुरुवंदना करण्यात आली. यावेळी अंगणवाडीतील तीन वर्षाच्या छोट्या बालकांमध्ये चिराग विरनोडकर, सावी नेवगी, गंधार  नाईक, चिन्मय नाईक, समर्थ काष्टे, स्निग्धा प्रभू, विशाखा  साठेलकर, तनया शिरसाठ, रिधिमा किटलेकर, अत्रय टोपले, गुरुराज केसरकर, सुखम करमळकर, शुभ्रा गावडे आदी सहभागी झाले होते. यावेळी पालक सौ सपना वीरनोडकर, स्वानंदी नेवगी, पल्लवी टोपले, भावना किटलेकर, भक्ती नाईक, रुची नाईक, नेहा काष्टे आदी पालक सहभागी झाले होते