राजकीय पक्ष प्रतिनिधींना मतदान प्रक्रियेविषयी मार्गदर्शन

आदर्श आचारसंहितेचे पालन करा – जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे
Edited by:
Published on: March 18, 2024 14:26 PM
views 109  views

सिंधुदूर्ग : लोकसभा सार्वत्रिक निवडणुक -2024 चा कार्यक्रम जाहिर झाला असून जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुका शांततेत पार पाडाव्यात या दृष्टीने सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी घेतली. यावेळी पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी रवींद्र मठपती, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी  प्रभाकर सावंत,  रवींद्र कसालकर, संजय पडते, श्री अनावकर ,निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे,उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, सहायक खर्च निरीक्षक श्री मेश्राम, श्री खोत, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मतदार शपथ देण्यात आली. निवडणूक आयोगाकडून ज्या मार्गदर्शक सूचना राजकीय पक्षांसाठी प्राप्त झालेल्या आहेत त्याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. 

आचारसंहिता लागू झाल्याने काय करावे, काय करु नये, नामनिर्देशनपत्र कसे भरावे, प्रचारासाठी खाजगी घरांच्या भिंती इत्यादींचा वापर करावयाचा झाल्यास संबंधित घर मालकाची  व स्थानिक प्राधिकरणाची परवानगी आवश्यक आहे असेही ते म्हणाले. जिल्हा माहिती अधिकारी तथा सदस्य सचिव माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती मुकुंद चिलवंत यांनी या समितीच्या कार्यप्रणाली विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. इलेक्ट्रॉनिक माध्यमातील सर्व जाहिराती आणि मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवस आधी प्रकाशित होणाऱ्या मुद्रित माध्यमांच्या जाहिरातीचे  प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले . 

खर्च व सनियंत्रण समितीच्या नोडल अधिकाऱ्यांनी उमेदवारांनी केलेला खर्च नियमितपने तपासून घेणे आवश्यक आहे, खर्च रजिस्टर मधील भाग एक मध्ये दैनंदिन खर्च अहवाल सादर करावा व तो समितीमार्फत नियमितपणे जुळून घ्यावा असेही ते म्हणाले.  उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी KYC म्हणजेच Know your Candidate या app बाबत सविस्तर माहिती दिली