सावंतवाडी कारागृहातील बंदीवानांसाठी 'श्रीमदभगवतगीता आत्मसाक्षात्काराचे विज्ञान'वर मार्गदर्शन

इस्कॉनचं आयोजन
Edited by: विनायक गावस
Published on: November 27, 2023 17:44 PM
views 186  views

सावंतवाडी : इस्कॉनच्या सावंतवाडी विभागाच्यावतीने सावंतवाडी कारागृहातील बंदीवानांसाठी 'श्रीमदभगवतगीता आत्मसाक्षात्काराचे विज्ञान' या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. कणकवली येथील एस एस पी एम इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ महेश साटम यांनी  कारागृहातील बंदीवानांना दोन तास या विषयावर अध्यात्मिक मार्गदर्शन केले.

. यावेळी कारागृह अधिक्षक संदीप एकशिंगे यांनी अशा अध्यात्मिक कार्यक्रमामुळे बंदीवानांच्या जीवनात शारीरिक, बौद्धिक, भावनिक व आध्यात्मिक परिवर्तन होऊ शकेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी कारागृह तुरुंगाधिकारी संजय मयेकर  यांनी कारागृहातील बंदीवानांसाठी हा अध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल इस्कॉनच्या सावंतवाडी विभागाचे आभार मानले. यावेळी इस्कॉनसे अनिरुद्ध प्रभूजी, दत्ताराम देसाई, दाऊजी बलराम, प्रवीण पवार कुमार पाटील, प्रकाश रेडकर, कारागृहाचे सुभेदार श्री धुमाळ आदी कारागृह कर्मचारी आदी उपस्थित होते.