
कुडाळ : एस.आर.पाटील कनिष्ठ महाविद्यालय, पाट येथे रस्ता सुरक्षा अभियान 2024 अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता रस्ता सुरक्षा, वाहतुकीचे नियम व चिन्हे या विषयावर प्रबोधन व मार्गदर्शन करण्यात आले.
सहा मोटर वाहन निरीक्षक अमित नायकवडी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री कोरे सर, सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री. सावंत, वाहन चालक श्री राणे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.