नांदगावात सायबर सुरक्षेविषयी मार्गदर्शन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 02, 2024 10:16 AM
views 222  views

देवगड : नांदगाव वाद्याचीवाडी येथे ग्रामस्थांना सायबर सुरक्षे विषयी माहिती व्हावी या साठी  मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  या अनुषंगाने नांदगाव वाद्याचीवाडी येथील ग्रामस्थांना  यावेळी सायबर सुरक्षा बाबत जनजागृती करण्यात आली. व सायबर सुरक्षेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. 

यावेळी नांदगाव गावचे सरपंच रविराज उर्फ भाई मोरजकर उपसरमंच इरफान साटविलकर व नांदगाव गावच्या पोलिस पाटीली वृषाली मोरजकर  नांदगाव गावातील ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कमला कॉलेज,कोल्हापूर मध्ये शिकणारी कु. हर्षली हनुमंत पाटील (रा. नांदगाव) व तिची सहकारी यांनी क्विक हिल फाउंडेशन अंतर्गत हा उपक्रम राबवला होता. 

या उपक्रमातून "सायबर शिक्षा व सायबर सुरक्षा या विषयी चे नांदगाव ग्रामपंचायत येथे गावातील ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले.सध्या वाढत्या सायबर गुन्हेगारी बद्दल जागरुक असणे खूप गरजेचे आहे. सायबर गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.आपण सायबर गुन्हेगारीचे शिकार होऊ नये यासाठी सायबर गुन्ह्यांपासून कसे जागरुक राहिले पाहिजे या विषयी ग्रामस्थांना हर्षली पाटील यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले.या मध्ये मोबाईलचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी, सोशल मिडिआचा वापर करताना अनोळखी व्यक्तींशी बोलू नये व त्यांच्याशी अनोळखी व्यक्तींना आपली माहिती देवू नये,तसेच बँकिंग फ्रॉड कसे केले जाताल व या पासून आपण कसे जागरुक राहिले पाहिजे आश्या विविध विषयांवरती या सायबर सुरक्षा जनजागृती या कार्यक्रमाच्या माध्यमातून येथील ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले.