सावंतवाडी येथे उद्या 'अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअर व प्रवेश प्रक्रिया..'' यावर मार्गदर्शन' | यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे आयोजन

Edited by: विनायक गावस
Published on: July 19, 2023 19:35 PM
views 88  views

सावंतवाडी : येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वतीने उद्या गुरुवार, दि.20 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता  'अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअर व प्रवेश प्रक्रिया' या मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.                                

अभियांत्रिकी पदवी प्रवेश प्रक्रियेकरिता विकल्प अर्ज भरण्याची फेरी - कॅप राऊंड उद्यापासून सुरू होत असून त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी या मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ.रमण बाणे हे  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील._

प्रवेश प्रक्रियेचे विकल्प अर्ज मोफत भरण्याची सोय देखील यावेळी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असेल. सत्राला उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सावंतवाडी बस स्थानक ते कॉलेजपर्यंत येण्यासाठी वाहतूक सुविधा कॉलेजतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे._

तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन सत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन कॉलेजतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी प्रा.दीपक पाटील  मोबा. 9421718850 यांचेशी संपर्क साधावा.