
सावंतवाडी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय , किर्लोस ओरस या महाविद्यालयाचे विद्यार्थी १५ जून रोजेगाव सावरवाड येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमानिमित्त उपस्थित झाले. १८ जूनला सावरवाड गावचे सरपंच देवयानी परब, उपसरपंच अनिकेत सदानंद म्हाडगुत, सदस्या रेषा कृष्णा तेली, मुख्याध्यापिका विभावरी सावंत आणि शेतकरी वर्गाच्या उपस्थितीत विद्यार्थी अथर्व प्रशांत मठकर , लक्षदीप प्रकाश शेटकर, श्रीनिवास महादेव वाळके, ऋत्विक दिनेश तेली व केरळचे दोन विद्यार्थी अनिरुद्ध .पी , अरुणदेव. सी पी यांनी जिल्हा परिषद शाळा कुरतडकरटेंब, सावरवाड येथे रावे कार्यक्रमाची सुरुवात केली.
यावेळी उपस्थित शेतकरी वर्गाला शेतीसाठी लागणारी शेती पूरक माहिती दिली व शेतीसाठी आवश्यक असणारे उपयुक्त किडे व हानिकारक किडे यांची ओळख करून दिली. यावेळी उपस्थित असलेले सरपंच ,उपसरपंच ,सदस्य ,मुख्याध्यापिका आणि जमलेल्या शेतकरी वर्गाने सहकार्य करत विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत गावामध्ये स्वागत केले .हा रावे कार्यक्रम चार महिने चालणार असून गावातील सर्व शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होणार आहे.