कळणे शाळेत अंमली पदार्थ सेवनविरोधात मार्गदर्शन

Edited by: लवू परब
Published on: July 04, 2024 11:02 AM
views 128  views

दोडामार्ग : नूतन विद्यालय कळणे दोडामार्गच्या स्थापना दिनानिमित्त व अंमली पदार्थ विरोधी सप्ताह निमित्त नूतन विद्यालय कळणे शाळेमध्ये अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम आणि नवीन कायद्यांची ओळख याबाबत कार्यशाळा घेऊन दोडामार्ग पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी मुलांना मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेमध्ये 10 शिक्षक व 80 विद्यार्थी उपस्थित होते. कार्यशाळेमध्ये अंमली पदार्थांच्या सेवनामुळे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम, तसेच अंमली पदार्थ सेवन व छुप्या पद्धतीने होणारी तस्करी यावरील कायद्यामध्ये असलेली तरतूद व शिक्षा याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

 तसेच ट्रॅफिक नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे एक जुलै 2024 रोजी पासून भारतीय कायद्यामध्ये झालेला बदल याचे मार्गदर्शन व माहिती दिली. यावेळी शाळेचे मुख्यध्यापक, शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी वर्ग यांना देण्यात आली.