गुहागर बायपास या कालावधीत राहणार बंद

Edited by: मनोज पवार
Published on: April 05, 2025 15:41 PM
views 90  views

चिपळूण : मुंबई - गोवा महामार्गाचे उर्वरित काम सुरु झाले असून शनिवार, दिनाक 5 एप्रिल 2025 रोजी रात्री 9:00 वाजले पासून गुहागर बायपास येथे मुंबई -गोवा महामार्गाच्या लगत असलेल्या मोरी व सर्व्हिस  रोडचे काम करण्यात येत असल्याने मुंबई गोवा महामार्गावरून गुहागर -चिपळूण बायपासकडे जाणारी-येणारी वाहतुक  सोमवार  दिनांक 07 एप्रिल 2025 रोजी रात्री 9:00 पर्यंत बंद राहील याची कृपया नोंद घ्यावी ,असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यानच्या कालावधीत नागरिकांची व वाहनचालकांची गैरसोय होणार आहे. परंतु पावसाळ्यापूर्वी हे काम होणे अपेक्षित असल्याने वाहनधारकांनी कृपया पर्यायी मार्गांचा वापर करावा व ठेकेदार कम्पनीला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.