
सावंतवाडी : भाजपला पराभव समोर दिसत असल्याने पालकमंत्री नितेश राणेंनी तसं वक्तव्य केलं आहे. दीपक केसरकर हे आमचे प्रमुख आहे. त्यांची साथ आम्हालाच आहे असं मत शिवसेना नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲड निता सावंत-कविटकर यांनी व्यक्त केले.
ॲड.सावंत म्हणाल्या, दीपक केसरकर यांनी सावंतवाडीचा कायापालट केला आहे. हे आता संकल्प करत आहेत. मात्र, ती काम 90 टक्के आम्ही पूर्ण केलीत. त्यांच विधान ऐकलेल नाही. पण, दीपक केसरकर आमचे प्रमुख आहेत. ते आमच्या सोबत आहेत. मैत्रीपूर्ण लढत होत आहे. स्वबळावर आम्ही लढत आहोत. त्यामुळे मित्राच्या बद्दल पालकमंत्री यांनी असं म्हणू नये. युवराज्ञींना मत म्हणजे दीपक केसरकर यांना मत हे सांगून केवळ गैरसमज पसरवण्याच काम होत आहे. भाजपला समोर पराभव दिसत असल्याने ते असं वक्तव्य करत आहे. सावंतवाडीकर जनतेनं यावर लक्ष देवू नये असं आवाहन केलं.
तसेच सर्वसमाज आमच्यासह आहे. यापूर्वी भाजपला मुस्लिमांचा राग येत होता. आता मात्र त्यांना सोबत ओढू पाहत आहेत. दीपक केसरकर यांचा स्वभावामुळे सर्वधर्मीय आमच्या सोबत आहेत. त्यामुळे भाजपकडून काही वक्तव्य होत आहे. गैरसमज पसरण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सावंतवाडीकरांनी केसरकर यांचे हात बळकट करावे असे आवाहन त्यांनी केले.










