सामाजिक कार्यकर्त्यांमुळे बांधिलकी'मुळे पालकमंत्री पोहचले बैठकीला !

Edited by: विनायक गावस
Published on: July 26, 2023 16:22 PM
views 269  views

सावंतवाडी : निरुखेवाडी येथे सकाळी सात वाजता रस्त्यावर झाड पडल होतं. शासनाची आपत्ती व्यवस्थापन टीम जागी वेळीच पोहचली नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला. त्यात सार्वजनिक बांधकाम तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण सावंतवाडी केसरी हून जिल्हा मुख्यालय ओरोसकडे येत असताना याच मार्गावर हे भलं मोठे झाड कोसळलं होते. यामुळे पालकमंत्र्यांना बैठकीसाठी येण्यासाठी तब्बल 15 मिनिटं उशीर झाला. सावंतवाडीतील सामाजिक बांधिलकीची टीम घटनास्थळी कार्यरत असल्यानं पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा ताफा पुढे जाऊ शकला.

सामाजिक बांधिलकीच्या टीमसह सामाजिक कार्यकर्ते महेंद्र सांगेलकर, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, श्याम हळदणकर व सुजय सावंत यांनी  झाड तोडून हटवण्यास मदत केली. संकेत मुंडये यांच्या जेसीबीनं हे मोठे झाड रस्त्यावरून हटवण्याचे विनामूल्य मोठे कार्य केले. त्यामुळे हा मार्ग मोकळा झाला. यावेळी पोलीस कर्मचारी महेश अरवारी, जगदीश दूधवाडकर, ग्रामस्थ बाबा शिंदे, मोहन ठाकूर, विजय बहादूर आदि उपस्थित होते. याच मार्गाने पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा ताफा पुढे गेला. 

दरम्यान, आपत्ती व्यवस्थापनाच्या भोंगळ कारभारामुळे पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत व्हीआयपी ची व्याख्या काय असा प्रश्न विचारला ? जर माझाच ताफा अडत असेल तर तुम्ही सर्वसामान्यांना काय सुविधा देणार असा सवाल उपस्थित करत आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांना धारेवर धरले.