पालकमंत्री रविंद्र चव्हाणांनी शब्द पाळला | उपजिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन मशीन दाखल

Edited by: विनायक गावस
Published on: March 12, 2024 11:22 AM
views 1357  views

सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीत अखेर सिटीस्कॅन मशीन दाखल झाली आहे. येत्या महिनाभरात ती कार्यान्वित होणार असून आता सावंतवाडी मध्येच सिटीस्कॅनची सोय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सिटीस्कॅनसाठी रूग्णांच्या नातेवाईकांना इतरत्र करावी लागणारी खटपट व धावपळ आता करावी लागणार नाही आहे‌. याबाबतची माहिती जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक राजू मसुरकर यांनी दिली. आपल्या जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानच्या माध्यमातून सिटीस्कॅनचा पाठपुरावा करण्यात आला होता. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे याबाबत मागणी केली होती. त्यानंतर ही मशीन उपलब्ध करून दिली. यासाठी राजू मसुरकर यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, हे कंत्राट एका खाजगी कंपनीला देण्यात आले आहे. त्या कंपनीच्या माध्यमातून गरीब तसेच दारिद्र्य रेषेखालील लोकांना मोफत तर अन्य रुग्णांना नाममात्र शुल्क भरून ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेले तज्ञ डॉक्टर टेली मेडिसिनच्या माध्यमातून या ठिकाणी आपला अभिप्राय देणार आहेत. त्यामुळे अत्यवस्थ परिस्थिती रुग्णांना तात्काळ सेवा देणे सोयीचे होणार आहे. तसेच अन्य खाजगी रुग्णालयांकडे गेल्याने होणारा आर्थिक भुर्दंड कमी होणार आहे. लवकरच ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.  याचा फायदा गोरगरीब रुग्णांना होणार असून गरजू व गोरगरीब रूग्णांना फायदा होणार आहे.