शहर विकासाबाबत वेधलं पालकमंत्री रवींद्र चव्हाणांच लक्ष !

Edited by: प्रतिनिधी
Published on: October 07, 2022 18:06 PM
views 214  views


सिंधुदुर्ग : सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे सावंतवाडी शहराच्या सर्वांगिण विकासाकरीता व समाजभिमुख पायाभुत सुविधा तातडीने पुर्णत्वास नेण्याकरीता सावंतवाडी शहरातील विकासकाम मंजुर करून मुबलक निधी मंजुर करण्याची मागणी भाजप नेते महेश सारंग, सावंतवाडीचे माजी सभापती तथा नगरसेवक अँड. परिमल नाईक, सु़धीर आडीवरेकर, उदय नाईक, नासीर शेख यांनी केली.  


शहरातील मोती तलाव हे सावंतवाडी संस्थान कालापासून शहराच्या सौंदर्यांमध्ये भर घालणारा मोती तला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन तातडीने मुबलक निधी मंजुर करून पडझड झालेला तलावाचा भाग जलद गतीने कामकाज पुर्ण करण्याचे  आदेश द्यावे, शहरात भुमीगत गटार योजना आराखडा तयार करण्यात आलेला असुन अस्तित्वात असलेली गटार पद्धत ही फार जुनी व संस्थान काळा पासुनची आहे. शहरात झालेली अवाजवी लोकसंख्या वाढीमुळे शहरातील सांडपाणी हा एक गंभीर विषय झालेला आहे. त्या करीता भुमीगत गटार योजने करीता आवश्यक निधी मंजुर करावा, 46 कोटीची नळपाणी योजना मंजुर करण्यात आलेली आहे. परंतु कोव्हीड - 19 च्या संकटामुळे शासनाने नविन योजनेवर निधी खर्च करण्यावर बंदी घातली होती. शहराला पाणी पुरवठा करण्याकरीता मुबलक साठा असुन जुनाट पाणी पुरवठा योजनेमुळे पुरेसे पाणी नागरीकांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे मंजुर नळपाणी योजनेला तातडीने निधी मंजुर करून नळपाणी योजनेचे काम पुर्णत्वास नेण्याकरीता संबंधीत अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत,  विज खांब व त्यावरील तारांचे जाळे निर्माण झालेले आहे परिणामी विदयुत भारीत तारा तुटुन त्यांच्या स्पर्शाने शॉक लागुन जिवीत हानी झाल्याच्या घटना आहेत. लोबत्या तारांमुळे विदयुत पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार तर सातत्याने घडतात. त्यामुळे भुमीगत विदयुत भारीत योजना तातडीने मंजुर करावी, भटक्या कुत्र्यांचा प्रार्दुभाव मोठया प्रमाणात झालेला असुन नसबंधी अगर तत्यम स्वरूपाची उपयायोजना करण्यासाठी तातडीने निधी मंजुर करावा, संस्थान काळापासुन अस्तित्वात असलेली "चेंडुफळी" जिमखाना मैदानावर "जमनाबाई पॅव्हेलीयन" अस्तित्वात आहे. हे पॅव्हेलीयन पुर्णपणे जीर्ण झालेले असुन अस्तित्वात असलेले वाद-विवाद व प्रलंबित न्यायालयीन खटल्याचा निपटारा करण्याचे आदेश संबंधितांना देऊन सुसज्ज पॅव्हीलीयन करीता निधी मंजूर करावा, शहरात मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल प्रस्तावीत असुन हॉस्पीटला सुलभ जागेची व्यवस्था करून आत्याधुनिक आरोग्य सुविधा प्राप्त करण्याकरीता तसेच पुरेसा निधी मंजुर करून तातडीने काम मार्गी लागण्याकरीता तसेच निष्णात वैद्यकिय अधिकाऱ्यांची तातडीने नियुक्ती करण्याकरिता आदेश पारीत करावे आदी मागण्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे करण्यात आल्या. सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर पालकमंत्री रवींद्र चव्हाण आले असता या मागण्या करण्यात आल्या. यावेळी भाजप नेते महेश सारंग, अॅड. परिमल नाईक, सुधीर आडीवरेकर, उदय नाईक,नासीर शेख आदी उपस्थित होते.