पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा उद्यापासून जिल्हा दौरा

4 रोजी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार जिल्हा नियोजन समिती सभा
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 02, 2022 18:41 PM
views 367  views

सिंधुदुर्गनगरी : राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार दि. 3 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 3.00 वाजता केसरी सिंधुदुर्ग येथे आगमन व राखीव.

शुक्रवार दि. 4 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 वाजता केसरी येथून माणगांव कुडाळकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र माणगांव येथे नाविन्यपूर्ण टेलिमेडीसिन सुविधा केंद्राचे उद्घाटन. सकाळी 10.00 वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र, माणगांव येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सभा स्थळ- जिल्हा नियोनज भवन, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग.

दुपारी 1.00 ते 2.00 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 2.00 वाजता सिंधुदुर्ग डोंगरी विभाग विकास कार्यक्रम समिती सभा. स्थळ- जिल्हा नियोनज भवन, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग. दुपारी 2.30 वाजता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ता निवडीसाठीची बैठक. स्थळ- जिल्हा नियोनज भवन, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग. दुपारी 4.00 वाजता जिल्हा कार्यकारणी बैठक, भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग. स्थळ- महालक्ष्मी हॉल, कुडाळ.

सायंकाळी 5.30 वाजता सिंधुदर्ग जिल्हा लाकूड व्यवसायिक यांच्या विविध मागण्यासंदर्भाद बैठक. स्थळ- महालक्ष्मी हॉल, कुडाळ. सायंकाळी 7.00 वाजता एम.आय.डी.सी. विश्रामगृह कुडाळ येथे आगमन व राखीव.

शनिवार दि. 5 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व विभागांची पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत विभागनिहाय आढावा बैठक. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग. दुपारी 12.00 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस अधिक्षक व सर्व पोलीस उप अधिक्षक आणि सर्व पोलीस निरीक्षक यांच्यासमवेत आढावा बैठक. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग. दुपारी 12.30 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायत यांची जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांच्यासमवेत आढावा बैठक. स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग.

दुपारी 1.00 ते 2.00 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 3.00 वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा येथील नाविन्यपूर्ण टेलिमेडीसिन सुविधा केंद्राचे उद्घाटन. सायंकाळी  5.00 वाजता वेंगुर्ला शहर पाणी पुरवठा योजना टप्पा क्र. 2 अंतर्गत निशाण तलाव धरणाची उंची 2.5 मीटरने वाढविणे या कामाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सायंकाळी 7.00 वाजता केसरी सावंतवाडीकडे प्रयाण.

रविवार दि. 6 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.00 वाजता केसरी येथून कुडाळ रेल्वेस्थानकाकडे प्रयाण. सायंकाळी 6.48 वाजता कुडाळ रेल्वेस्टेशन येथे आगमन व कोकणकन्या एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.