पालकमंत्री नितेश राणे बुधवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: September 16, 2025 21:11 PM
views 32  views

सिंधुदुर्गनगरी :  राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे बुधवार 17 सप्टेंबर 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 

बुधवार 17 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12:40 वाजता दाभोळीम आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोवा येथे आगमन व मोटारीने सिंधुदुर्गकडे प्रयाण, दुपारी 2:30  वाजता राष्ट्रनेता व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन (17 सप्टेंबर 2025)  ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती ( 2 ऑक्टोबर 2025)  या कालावधीत ' सेवा पंधरवडा 2025' या कार्यक्रमास उपस्थिती

( स्थळ :जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग ), दुपारी 3:00 वाजता.  SNSP स्वस्थ नारी सशक्त परिवार मोहिमेच्या शुभारंभास उपस्थिती, (स्थळ: उपजिल्हा रुग्णालय कणकवली),  दुपारी 4:00 वाजता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ, (स्थळ: ग्रामपंचायत कार्यालय,  लोरे नं. १, तालुका कणकवली ), दुपारी 4:30 वाजता नवीन कुर्ली पुनर्वसन समस्यांबाबत चर्चा व बैठक, (स्थळ:  कुर्ली, तालुका कणकवली),  सायंकाळी 6:00वाजता तळेरे ते गगनबावडा  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 संदर्भात आढावा बैठक, (स्थळ :कणकवली शासकीय विश्रामगृह ), सायंकाळी 6:30 वा.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारत संचार निगमच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक, (स्थळ: कणकवली शासकीय विश्रामगृह),  सायंकाळी 7:00 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक,  (स्थळ: कणकवली शासकीय विश्रामगृह कणकवली)