
सावंतवाडी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिक्षण महर्षी विकास सावंत यांचे अलीकडेच दुःखद निधन झाले होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी माजगाव येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देत कै. विकास सावंत यांचा सुपुत्र विक्रांत सावंत व कुटुंबीयांचे सांत्वन केले.
विकास सावंत यांचे राणे परिवाराशी नेहमीच सलोख्याचे व कौटुंबिक संबंध होते. त्यांच्या निधनामुळे एक जवळचा मार्गदर्शक हरपला, अशा शब्दात नितेश राणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. रेश्मा सावंत, माजी जिल्हा परिषद सभापती गुरुनाथ पेडणेकर, माजी सभापती राजू परब, माजी सभापती प्रमोद सावंत, माजी नगरसेवक तथा भाजपचे जिल्हा चिटणीस मनोज नाईक, भाजप सावंतवाडी शहर अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, काँग्रेसचे पदाधिकारी बाब्या म्हापसेकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. दिनेश नागवेकर, संचालक प्रा. बाळासाहेब नंदीहळळी आदी उपस्थित होते.