माईण येथील सुखटणकर कुटुंबीयांची पालकमंत्री नितेश राणेंनी घेतली भेट

Edited by:
Published on: April 13, 2025 19:51 PM
views 162  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील माईण येथील   अनिल दिनकर सुखटणकर यांच्या घराला अचानक भीषण आग लागली होती. या आगीत घर संपूर्णतः जळून खाक झाले होते.  अंदाजे  ६१,३४,९००/- इतके नुकसान झाले होते. आज पालकमंत्री नितेश राणे यांनी सुकटणकर कुटुंबीयांची भेट घेऊन घर जळालेल्या ची वस्तुस्थिती जाणून घेतली व पाहणी केली.सुखटणकर कुटुंबास योग्य ती मदत मिळावी यासाठी स्थानिक प्रशासन व अधिकारी व वीज मंडळ यांनी आवश्यक पावले उचलावीत,अशा सूचना नामदार नितेश राणे यांनी दिले आहेत.

मत्स्य व्यवसाय व बंदर विकास तथा पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांनी माईण गावाला भेट देऊन आपदग्रस्त कुटुंबाची भेट घेतली आणि नुकसानग्रस्त ठिकाणाची पाहणी केली.सदर आगीच्या घटनेचा पंचनामा ग्राम महसूल अधिकारी, ओटव यांनी तयार करून संबंधित कार्यालयात सादर केला आहे. या अहवालास अनुसरून पुढील मदत व कार्यवाहीची करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आदेश दिले आहे. यावेळी मंडळ अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत आदी उपस्थित होते.