LIVE UPDATES

Sawantwadi news : सावंतवाडीत 'भू प्रणाम केंद्रा'चे पालकमंत्र्यांकडून उद्घाटन

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 04, 2026 20:33 PM
views 78  views

सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्यावतीने सावंतवाडी येथील उपअधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयात 'भू प्रणाम केंद्रा'चे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले.

'भूमीचा सन्मान, देशाचा अभिमान' हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू करण्यात आलेल्या या केंद्रामुळे तालुक्यातील नागरिकांना भूमि अभिलेख व महसूल विभागाशी संबंधित सेवा अधिक गतीने आणि पारदर्शकपणे मिळण्यास मदत होणार आहे.

याप्रसंगी आमदार दीपक केसरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, भूमि अभिलेख विभागाचे प्रभारी जिल्हा अधीक्षक अनुप जावळे, सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी विरसिंग वसावे, भूमि अभिलेखचे  उपअधिक्षक  विनायक ठाकरे, पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, नगरपरिषद सभापती सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, सौ. मोहिनी मडगांवकर, दीपाली भालेकर, नगरसेवक ॲड . सिद्धार्थ भांबुरे, नगरसेविका सुकन्या टोपले, सुनिता पेडणेकर, एन. बी. रेडकर, ॲड. तेजस परब, माजी नगरसेवक उदय नाईक आदी उपस्थित होते.

सावंतवाडी तहसीलदार कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या उपअधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयाच्या आवारात सायंकाळी ७ वाजता हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या 'भू प्रणाम केंद्रा ' मुळे तालुक्यातील नागरिकांना भूमि अभिलेख व महसूल विभागाशी संबंधित सेवा अधिक गतीने आणि पारदर्शकपणे मिळण्यास मदत होणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.