पालकमंत्री गायबच झाले : डॉ. जयेंद्र परुळेकर

Edited by: विनायक गांवस
Published on: August 30, 2024 10:24 AM
views 148  views

सावंतवाडी : राजकोट मालवण येथे जो राडा झाला तो काही वर्षांपूर्वी वेंगुर्ल्यात झालेल्या राड्याची आठवण ताजी करणारा होता. राज्यभरात सुसंस्कृत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा राडा संस्कृतीशी जोडण्याचा हा लांच्छनास्पद प्रकार होता. खरं तर जिल्ह्याचा अपमान आहे असे मत शिवसेना ठाकरे सेनेचे प्रवक्ते जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केले. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तर गायबच झालेले आहेत. पुतळ्याची काळजी घेण्याची जबाबदारी खरं तर सार्वजनिक बांधकाम विभागाची होती असं ते म्हणाले.

पुतळा नौदलाने बांधला असं जनतेची दिशाभूल करणारे विधान करून पालकमंत्री नामानिराळे होऊ पाहात आहेत. असा आरोप श्री परुळेकर यांनी यावेळी केला. "घरात फिरून रात्री एकेकाला मारून टाकीन"  "पुतळा पडला म्हणून तुमच्या भावना दुखावल्या काय?" अशी मुजोर वक्तव्यं नवनिर्वाचित खासदार माजी मुख्यमंत्री कर असतील तर ते कुठल्या संस्कृतीचे दर्शन आपण महाराष्ट्राला देत आहोत ह्याचे भान देखील राणेंना राहिलेलं दिसत नाही असाही टोला ही त्यांनी यावेळी हाणला.दरम्यान "पुतळा पडला हे शुभसंकेतच आहेत, ह्यातून पुढे चांगलंच घडेल.आता शंभर फूटी पुतळा उभारू " अशी संतापजनक वल्गना शिक्षणमंत्री करत आहेत. याबद्दल देखील परूळेकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला.