
दोडामार्ग : स्मार्ट ग्रामपंचायत आयनोड़े–हेवाळे अंतर्गत पालकमंत्री नितेश राणे व स्थानिक आमदार दीपक केसरकर आणि महायुतीच्या माध्यमातून हेवाळे गावात विविध विकासकामांना मंजुरी मिळाली असून, या विविध कामांचे भूमिपूजन तसेच पूर्ण झालेल्या कामांचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले.
या कार्यक्रमास भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक गवस, सुधीर दळवी, रमेश दळवी, आनंद तळणकर, पराशर सावंत, देवेंद्र शेटकर, भैय्या पांगम, सूर्या धरणे, दिक्षा महालकर, यांसह शिवसेनेचे मायकल लोबो पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, अधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी एकूण ७ विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्यामध्ये हेवाळे माय गवस मंदिर येथे निवारा शेड बांधकाम (३ लाख रुपये – डोंगरी विकास योजना), माय गवस मंदिर येथे स्वच्छतागृह बांधकाम (१ लाख २३ हजार रुपये – १५वा वित्त आयोग, ग्रामपंचायत स्तर), जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा हेवाळे येथे नवीन वर्गखोली बांधकाम (१५ लाख रुपये – समग्र शिक्षण अभियान) यांचा समावेश आहे.
तसेच तिलारी चाफ्याचे भाटले बाबरवाडी ते हेवाळे रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण (१८ लाख रुपये – एस.आर. फंड), हेवाळे अंगणवाडी ते जिल्हा परिषद शाळा रस्त्यालगत गटार बांधकाम (२ लाख ३७ हजार रुपये – १५वा वित्त आयोग), ग्रामपंचायत जवळील स्वच्छतागृह दुरुस्ती व इतर अनुषंगिक कामे (१ लाख ३३ हजार रुपये – १५वा वित्त आयोग) आणि मुळस राम मंदिर येथे सभामंडप बांधकाम (८ लाख रुपये – डोंगरी विकास योजना) या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
याचप्रसंगी २ पूर्ण झालेल्या कामांचे उद्घाटन करण्यात आले. त्यामध्ये केंद्रे पुनर्वसन येथे अंगणवाडी इमारत बांधकाम (१३ लाख रुपये – डोंगरी विकास योजना) तसेच बांबर्डे येथे अंगणवाडी इमारत बांधकाम (१३ लाख रुपये – डोंगरी विकास योजना) यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमास सरपंच साक्षी संदीप देसाई, सदस्य जानवी खानोलकर, समीर देसाई, स्वप्नील देसाई, ऋषभ देसाई, जयवंतराव देसाई, बापूसाहेब देसाई, भाऊसाहेब देसाई, गोविंद गवस, मधुसूदन गवस, विलास गवस, तानाजी देसाई, गुरु देसाई, विलास नाईक, रुपेश गवस, बाळासाहेब देसाई, आनंद शेटकर, ग्रामपंचायत अधिकारी जनार्दन खानोलकर, तसेच उदय जाधव, दयानंद राणे, संदीप नाईक, उत्तम ठाकुर, विनायक गवस, विलास नाईक, सोमा नाईक, मालू गवस उपस्थित होते.
तसेच अंगणवाडी सेविका तेजस्विनी गवस, सुधा देसाई व अंगणवाडी मदतनीस विजीता देसाई, वैदही नाईक यांचीही उपस्थिती होती. ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमामुळे हेवाळे गावाच्या विकासाला अधिक गती मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.










