
वेंगुर्ला : आसोली सक्राळवाडी आंब्याचा बाव ओहळा नजीक संरक्षक भिंत बांधणे या सुमारे १८ लाख रुपये किमतीच्या आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विकासकामाचे भूमिपूजन शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
गेली अनेक वर्षे स्थानिक ग्रामस्थांकडून या कामाची मागणी होती. याबाबत सुनील मोरजकर यांच्या प्रयत्नातून व शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, कोचरा सरपंच योगेश तेली यांच्या पाठपुराव्याने हे विकास काम ग्रामविकास निधीतून आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून सदर काम मंजूर करण्यात आले. याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आमदार दीपक केसरकर यांचे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी आसोली सरपंच बाळा जाधव, उपसरपंच संकेत धुरी, शिवसेना कोस्टल विभाग तालुका प्रमुख काशिनाथ नार्वेकर, युवासेना तालुका प्रमुख आणि आसोली ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील गावडे, तालुका सरचिटणीस संजय गावडे, ग्रामपंचायत सदस्य राकेश धुरी, शिवसेना आसोली शाखा प्रमुख नंदकुमार घाडी आणि विजय धुरी, ग्रामस्थ अनंत धुरी, महादेव धुरी, जयदेव धुरी, वसंत धुरी, सुधाकर, सीताराम गाडेकर,सोमनाथ नाईक,रमेश भानजी, बापू भानजी, सोनू धुरी, हरिश्चंद्र धुरी, अनंत मेस्त्री, प्रमोद मेस्त्री, रमेश धुरी, हनुमंत धुरी आदी उपस्थित होते.










