देवगड हडपिड मधलीवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न

Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 13, 2026 20:16 PM
views 31  views

देवगड : पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून २० लाखांचा निधी मंजूर करून देऊन  देवगड-निपाणी मुख्य रस्त्यापासून हडपिड मधलीवाडीपर्यंतच्या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजना ग्रामीण रस्ते अंतर्गत २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्यामुळे ग्रामस्थांची रस्तादुरुस्तीची मागणी पूर्ण झाली आहे.या विकासकामाचे भूमिपूजन भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य मिलिंद साटम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम प्रमुख उपस्थित होते.यावेळी संदीप साटम यांनी, “यापूर्वीही भाजपच्या माध्यमातून आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या सहकार्याने हडपिड गावात विविध विकासकामे पूर्ण झाली आहेत.आगामी काळात देखील गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे सांगितले.

स्थानिक ग्रामस्थांकडून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी सातत्याने होत होती.अखेर कामाला मंजुरी मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले.कार्यक्रमाला राजेंद्र शेटये, सुभाष नार्वेकर, मंगेश लोके, संतोष फाटक, सरपंच संध्या राणे, उपसरपंच दाजी राणे, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.