
वेंगुर्ला: कोकणातील आंबा व काजू बागायतदारांच्या हक्कासाठी होणाऱ्या मोर्चात वेंगुर्ला तालुक्यासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वेंगुर्ला तालुका शेतकरी न्याय हक्क संघटनेचे अध्यक्ष संजय गावडे यांनी केले आहे.
अस्मानी-सुल्तानी संकटामुळे झालेल्या नुकसानीसाठी आंब्याला हेक्टरी ५ लाख, काजूला हेक्टरी ३ लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी या मागणीसाठी गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्री निवासस्थान 'वर्षा', बंगला मुंबई असा मोर्चा लढण्यात येणार आहे. सरकारने फक्त हेक्टरी 22 हजार रुपये जाहीर केले फक्त, आमिष दाखवून शेतकऱ्यांना गप्प केले. शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली गेले 3 महिने तालुक्यात जिल्ह्यात विविध मोर्चा, आंदोलन, रास्ता रोको करूनही शेयतकऱ्यांचा विचार नाही या सरकारने केला नाही जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी केला. खोटी आश्वासन देऊन आंदोलन वेळोवेळी आंदोलन थांबविण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे शेतकऱ्यांचा या सरकार वर विश्वास राहिला नाही. जिल्यातील सत्ताधारी नेतृत्व हीन असल्याने राजु शेट्टी यांच्या नेतृत्वात मुखमंत्री निवास्थानी मोर्चा काढावा लागतोय. हें या जिल्ह्याचे दुर्दैव आहे. आक्रोश मोर्चा वेळी पालकमंत्र्यांनी नुकसान भरपाई देण्याच जाहीर केल होत, त्या बद्द्ल आता पालकमंत्री काही बोलत नाहीत. सध्या शेतकऱ्यांना कुणीही वाली नाही. त्यासमुळे मोर्चा हा निघणारच. मोठ्या संख्येने शेतकरी मुंबई मधे दाखल होतील आणि व्हावे आस आवाहन करीत आहे. तसेच मुंबई मधील कोकणातील नोकरीं साठी असलेल्या शर्यकऱ्यांनी बागायतदारांनी मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहनही संजय गावडे यांनी केले आहे. नुकसान भरपाई मिळे पर्यंत गप्प बसणार नाही. असा निर्धार शेतकरी बागायतदारांनी केले असल्याचेही ते म्हणाले.
शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली १५ मे रोजी दुपारी ३ वाजता गिरगाव चौपाटी तें मुख्यमंत्री निवस्थान असा हा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष,मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्षानेही मोर्चाला पाठिंबा जाहीर केला आहे.
वेंगुर्ला हा आंबा-काजूचा मोठा पट्टा आहे. गेल्या दोन महिन्यांपासून येथील शेतकरी नुकसानाने अडचणीत आहे. त्यामुळे वेंगुर्ला तालुक्यातील प्रत्येक गावातील बागायतदार, शेतकरी संघटना, ग्रामस्थांनी आपल्या वाहनांची व वेळेची सोय करून मुंबईतील मोर्चात सहभागी व्हावे. तसेच कोकणातील आपल्या बांधवांच्या हक्कासाठी मुंबईत राहणाऱ्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, ठाणे जिल्ह्यातील चाकरमान्यांनीही या मोर्चात मोठ्या संख्येने सामील व्हावे. गावागावात संपर्क साधून जास्तीत जास्त शेतकरी व नागरिकांना मोर्चाची माहिती देऊन मुंबईत आणण्याचे नियोजन स्थानिक कार्यकर्त्यांनी सुरू केले आहे. अधिक माहितीसाठी आपल्या तालुका शेतकरी प्रतिनिधींशी संपर्क साधा.
आता मुंबई मोर्चात मुख्यमंत्री यांच्या कडून नुकसान भरपाई घेऊनच पुन्हा कोकणात परत येण्याचा निर्धार केला असून मोठ्या संख्येने शेतकरी बागायतदार यांनी मुंबई मध्ये येण्याचं आवाहंन वेंगुर्ला तालुका शेतकरी संघटना अध्यक्ष संजय गावडे यांनी केल आहे.











