परमेत सुमारे २७ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन

Edited by:
Published on: January 08, 2026 15:27 PM
views 57  views

दोडामार्ग : परमे येथे आज विविध योजनांतर्गत सुमारे २७ लाख रुपये किमतीच्या विविध विकासकामांचा श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यामध्ये अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला फणसवाडी रस्ता जिल्हा नियोजन निधीतून १० लाख रुपये खर्च करून काँक्रेटीकरण करण्यात येणार असून, तसेच जिल्हा जनसुविधा योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांची कामे समाविष्ट आहेत.

हा निधी भारतीय जनता पक्ष, पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून तसेच जिल्हा चिटणीस सुधीर दळवी, भाजप तालुका अध्यक्ष दीपक गवस यांच्या विशेष प्रयत्नांतून प्राप्त झाला आहे. या कामांसाठी सरपंच प्रथमेश मणेरीकर, परमे भाजप बूथ अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य शैलेश बोर्डेकर यांच्या सातत्यपूर्ण व यशस्वी पाठपुराव्यामुळे मंजुरी मिळाली आहे.

तसेच परमे मडाळवाडी येथे आवश्यक असलेल्या कालव्यावरील काँक्रेट पुलाचे काम अंदाजे १२ लाख रुपये किमतीचे असून, हे काम सरपंच व ग्रामपंचायत सदस्य सौ. संजना सावंत यांच्या पाठपुराव्याने मंजूर झाले आहे. या कामामुळे अनेक वर्षांची ग्रामस्थांची मागणी पूर्ण झाल्याचे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

या भूमिपूजन प्रसंगी भाजप जिल्हा चिटणीस सुधीर दळवी, सरपंच प्रथमेश मणेरीकर, उपसरपंच सुनील गवस, ग्रामपंचायत सदस्य, बूथ अध्यक्ष शैलेश बोर्डेकर, ग्रामपंचायत सदस्य सौ. संजना सावंत, देवस्थान मानकरी गोपाळ गवस, तसेच संजय उसपकर, संतोष गावडे, पांडुरंग गावडे, सुशांत परमेकर, राजा गावडे, विठोबा गावडे, मनोहर बिर्जे, अशोक गावडे, सखाराम घोगळे, सुभाष गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.