लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना कळसुलकर स्कूलमध्ये अभिवादन

Edited by: विनायक गावस
Published on: June 27, 2023 15:18 PM
views 73  views

सावंतवाडी : सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचालित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी येथे दिनांक-२६-०६-२०२३ रोजी रोजी लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.


यावेळी प्रशालेचे प्रभारी मुख्यध्यापक, शिक्षक, विद्यार्थी प्रतिनिधींकडून राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले. यावेळी इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी राजर्षी शाहू महाराज यांचे बालपण, जीवन, लोककल्याणकारी कार्य यावर भाषने केली.


कार्यक्रमास लाभलेले प्रशालेच्या सांस्कृतिक समिती प्रमुख व प्रमुख वक्ते ज्येष्ठ शिक्षिका श्रीम. जे एस पावसकर यांनी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनाविषयी, लोककल्याणकारी कार्य विषयी माहिती आपल्या भाषणातून दिली.


प्रशालेचे प्रभारी मुख्यध्यापक श्री एस व्ही भुरे यांनी महाराजांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.


यावेळी प्रशालेतील शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री अनिल ठाकर यांनी मानले.