
सावंतवाडी : एस.एस.पी.एम मेडीकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटल पडवे, सिंधुदुर्ग व ग्रामपंचायत माजगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर माजगाव ग्रामपंचायतमध्ये आयोजित करण्यात आले.
त्यावेळी उद्घाटन कार्यक्रमाला माजगाव सरपंच अर्चना सावंत, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रेश्मा सावंत, उपसरपंच संतोष वेजरे उर्फ बाळा वेजरे, व कानसे, धुरी, कासार, कुंभार, भोगण इ. ग्रामपंचायत सदस्य व अजय सावंत, सुधीर वारंग हे उपस्थित होते.
यावेळी डॉ. पूर्वा राऊत, डॉ. प्रणाली पाटील, डॉ. रिजवान बोबडे, डॉ. संजय जोशी यांनी तपासणी करुन रुग्णांना मार्गदर्शन केले. गर्भाशय कर्करोग, स्तनाचा कर्करोग, तोंडाच्या कर्करोगावर मार्गदर्शन करण्यात आले. या शिबीराचा गावातील १५० महिलांनी लाभ घेतला.