
देवगड : देवगड खुडी कोटकामते येथील बागेमधून दोन ग्रास कटर व पॉवर व्हिडरचे दोन टायर अज्ञात चोरट्यान कडून लंपास करण्यात आले आहेत. देवगड तालुक्यातील खुडी कोटकामते हद्दीवरील बागेतील मांगरच्या मागे ठेवलेले दोन ग्रास कटर व पॉवर व्हिडरचे दोन टायर अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची फीर्याद खुडी वावुरवाडी येथील रविराज अनंत जोईल यांनी देवगड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या तक्रारीनुसार देवगड पोलीस स्थानकात अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांन कडून मिळालेल्या माहिती च्या आधारे, ही घटना २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वा. ते २२ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या कालावधीत घडली. या घटनेत किसान कंपनीचा एक ग्रास कटर अंदाजे रुपये ४ हजार रुपये तसेच चायना कंपनीचा एक ग्रास कटर अंदाजे रुपये १ हजार रु. तसेच दोन टायर रुपये ५०० रु. किमतीचे असा एकूण ५५००/- मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला.
या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार महेंद्र महाडिक करीत आहेत.या घटनेसंदर्भात अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवी कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.