
रत्नागिरी : शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालय,खरवते-दहिवलीमधील विद्यार्थ्यांकडून नुकतीच " मल्टीपरपज फुड प्रोसेसिंग मशिन "ची रचना करण्यात आली. महाविद्यालयामधील कृषि ,अन्नतंत्रज्ञान व जैवतंत्रज्ञान महाविद्यालयामधील कु.मयुर कोल्हे, कुमारी जुईली रहाटे,कुमारी रिद्धी माळी ,कुमारी मृण्मयी चिंचोरे यांनी प्रा.रविंद्र माने यांचे मार्गदर्शनाखाली या मशीनची निर्मिती केली.या मशिन साठी महाविद्यालयाच्या माध्यामातून पेटंट साठी प्रयत्न करण्यात आले होते.दि. 30 सप्टेंबर रोजी पेटंट कार्यालय,भारत सरकार यांचे मार्फत या मशीन ला पेटंट साठी मान्यता देण्यात आली. सदर मशीन नाचणी उत्पादक,कुक्कुटपालन उदयोजक, फळे व भाजी पाला उद्योजक यांच्यासाठी वरदान ठरणार आहे.या मशीनला यापुर्वी देखील महाराष्ट्र कौशल्य, उद्योजकता व नावीन्यता विकास विभागातर्फे आयोजित केलेल्या महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज या कार्यक्रमाअंतर्गत तीन लाख रुपये रोख पारितोषिक देखील मिळाले आहे. या मशिनसाठी मिळालेल्या पेटंट ही महाविद्यालयासाठी व सहभाग विद्यार्थ्यी यांचे साठी गौरवाची बाब आहे.या यशाबद्दल चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार व सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री.शेखरजी निकम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांनी प्रा.रविंद्र माने व सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील सर्व उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.